पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात व शहराबाहेरील काही देशी दारूची दुकाने व धाब्यावर तस्करांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. या देशी दारू दुकानांमधून व धाब्यावरून फोनवरूनच तस्करांसाठी दारूचे पार्सल तयार करून ठेवण्यात येते. अवैध दारू विक्रेत्यांना व तस्करांना दारू दुकानांमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने अवैध दारू विक्री व तस्करीला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू विक्री व तस्करी रोखण्याकरिता आधी दारूचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या दारू दुकानांवर लक्ष केंद्रित करून त्यांना रडारवर घेणे आवश्यक झाले आहे. नव्याने रुजू झालेले जिगरबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्वप्निल लोखंडे यांनी अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
रुजू झाल्यापासून अनेक कारवाया दारू असेल जुगार असेल अशा अनेक ठिकाणी धाडी टाकल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) फुलचंद धनू पवार, वय 60 वर्षे, रा. रहिमनगर नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि 08.08.2023 रोजी 14.30 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 600 ₹ किंमतीचे 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे 2) कल्याणी आनंद धरणे, नंदगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद या याच दिवशी 17.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर आरोपी नामे 3)माया भागवत मिसाळ, वय 41 वर्षे , रा. लक्ष्मीनगर चिवरी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद या याच दिवशी 16.00 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरा समोर चिवरी येथे अंदाजे 900 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर आरोपी नामे 4) वामन गुंडू कदम, वय 60 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 14.40 वा. सु. अमर बारचे बाजूस अंदाजे 2,660 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 38 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्छेशाने बाळगलेले, तर आरोपी नामे 5) सुबान गोडाजी वाघमारे, वय 72 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर हे याच दिवशी 18.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,080 ₹ किंमतीची 32 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे- 6)गजानन विष्णु लोखंडे, वय 38 वर्षे रा. भिमनगर, जळकोट, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 14.40 वा. सु. जळकोट येथे वैष्णवी किराणा दुकानाचे बाजूचे चिंचेचे झाडाखाली अंदाजे 1,160 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे 7)धिरज भिकनसिंग परदेशी, वय 48 वर्षे रा. बसस्टॅड पाठीमागे नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे याच दिवशी17.00 वा. सु. निसर्ग धाबा हॉटेलचे बाजूस 1,700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे- 8)दशरथ विलास वाघमोडे, वय 38 वर्षे रा. ईटकळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 13.15 वा. सु. एमबीएम ट्रान्सपोर्टच्या बाजूला ईटकळ येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 8 गुन्हे नोंदविला आहेत.
प्रतिनिधी आयुब शेख