उमरखेड प्रतिनिधी :
तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करून तसेच त्यांच्या मानधनात वाढ करून न्याय देण्याची मागणी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनू खतीब यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि .४ सप्टेंबर रोजी केली आहे
ज्याप्रमाणे राजस्थान ,गुजरात राज्यात रास्तभाव दुकानदारांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील तसेच उमरखेड तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या मानधनात वाढ व धान्यसाठा (इष्टांक ) वाढवावा तसेच दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढत्या मूल्यांकन प्रमाणे वाढ देण्यात यावी अथवा प्रति महिना मानधन लागू करावे अशा आशयाचे निवेदन युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनु खतीब यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे .
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रास्तभाव दुकानदारांनी नागरिकांची गैरसोय न होता धान्य वाटप केले याची दखल घेऊन मंत्री महोदय यांनी तात्काळ रास्त भाव दुकानदाराच्या मानधनात वाढ करून प्रलंबित मागण्याचा विचार करून न्याय देण्याची मागणी केली आहे