सोनू खातीब
उमरखेड प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षापासून तुळजापूर बोरी महामार्गाचे काम सद्भाव कंपनीच्या बोगस कारभारामुळे रखडले आहे .त्यामुळे या रस्त्यावर अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच दिनांक 24 ऑगस्ट रोजी फातेमा शेख माजिद वय पाच वर्ष राहणार सुकळी (ज) हिला अपघातात आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या रस्त्याचे काम करणारी सद्भाव व शेखावटी इंटरप्राईजेस या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतक मुलीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत तात्काळ या कंपनीकडून देण्यात यावी अशी मागणी सोनू खतीब उपाध्यक्ष युवक काँग्रेस यवतमाळ जिल्हा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्भाव कंपनीला वारंगाते महागाव ते 65 किलोमीटरचे कंत्राट देण्यात आले होते. गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये या महामार्गावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडतात. याचा त्रास दुचाकी, चार चाकी व सर्वच वाहनांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. अशातच महामार्गाचे उड्डाणपूल व बाजूचे रस्ते हे सुद्धा अपूर्ण असून बाजूच्या रस्त्याने जात असताना गावातील लहान मुले पाळीव प्राणी यांना अनेकदा इजा झालेली आहे.
मृतक मुलगी ही अतिशय गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्या कुटुंबाला आज रोजी आर्थिक आधाराची अवस्था आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्याकडून दंड म्हणून 50 लाख रुपये सदर कुटुंबाला देण्यात यावे असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर सदोश मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची लेखी तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये सोनू खतीब यांनी केली आहे .