section and everything up until
* * @package Newsup */?> शेतकऱ्यांचे हित जपत सर्वाधिक भाव मांजरा साखर कारखान्याने दिल्याने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडली | Ntv News Marathi

सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने मांजरा कारखान्याची दैदिप्यमान वाटचाल सुरू

राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

सर्वसाधारण सभेला सभासदांची मोठी उपस्थिती

लातूर

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून, शेतकरी सभासदांचे हित जपत उसाला सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला त्यामुळें आज जिल्हाभरात आर्थिक क्रांती घडली असून सर्वांना सोबत घेऊन मांजरा साखर कारखान्याची दैदिप्यमान वाटचाल सुरू असल्याचे राज्याचे माजी मंत्री मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले ते सोमवारी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 39 वी वार्षिक सर्वसाधारण कारखाना स्थळी घेण्यात आली त्यावेळी सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

या सर्वसाधारण सभेस प्रमुख अतिथी म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, रेनाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मांजरा साखर कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक पंडित देसाई, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच.जे.जाधव, मांजरा परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी व आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उस तोडणी नवा पॅटर्न ज्यूस पासून इथेनॉल निर्मिती यशस्वी

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की मांजरा साखर कारखान्यात सक्षम नेतृत्वात एकाविचाराने व एकदिलाने साखर कारखान्याची वाटचाल होत असून साखर उद्योगात होत असलेले बदल लक्षात घेऊन बदलांचा स्वीकार मांजरा कारखान्याने नेहमी केला. म्हणूनच ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीचा नवा पॅटर्न आपण सुरू केला. काळाची गरज ओळखून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती कारखान्याने सुरू केली. ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता कारखान्याच्या क्षमतेचा विस्तार करणे गरजेचे होते. त्यानुसार गाळप क्षमतेचा विस्तार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख यांनी आगामी काळात येणाऱ्या दिवाळी सण निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मांजरा कारखाना कर्मचाऱ्यांना १०% (दहा) टक्के बोनस देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले त्यामुळे मांजरा साखर कारखाना अधिकारी कर्मचारी कामगार यांची दिवाळी गोड होणार आहे

राज्यातील सहकार क्षेत्रात मांजरा साखर कारखान्याने लौकिक कायम ठेवला आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन

यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, मांजरा साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात आपला लौकिक कायम ठेवला असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा कारखाना ही ओळख कायम ठेवली आहे. लहानपणापासून विविध कार्यक्रमासाठी साहेबां सोबत मांजरा कारखान्यांमध्ये येण्याचा योग येत होता. तेंव्हा पासून मांजरा कारखान्याशी एक भावनीक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. विलासराव देशमुख साहेबांनी साखर कारखानदारीला दिशादर्शक असणारे कार्य करून शेतकरी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला म्हणूनच एक विश्वासाचे नाते निर्माण झाले व आज देखील ते नाते कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात कारखान्याच्या वाटचालीचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला तसेच ऊस तोडणी यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी सर्व साधारण सभेसमोरील सर्व विषयांचे वाचन केले त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. कार्यक्रमास शेतकरी सभासद, कारखाना खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार संचालक ज्ञानेश्वर भिसे यांनी मानले.

प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी
लातूर 9850347529 / 9822699888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *