भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा मोळी पूजन व गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात
(सचिन बिद्री:उमरगा)
उमरगा-लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना समुद्राळ (को) संचलित क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. चा पाचवा मोळीपूजन व गाळप हंगाम शुभारंभ (दि.२९) पाचवे पिठाधिपती श्रीनाथ संस्थान औसा चे ह भ प सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष ह. भ. प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, चेअरमन सुरेश बिराजदार, क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे ,व्हा चेअरमन पद्माकरराव हराळकर, सुनील माने, राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
भाऊसाहेब बिराजदार अत्यंत संघर्षातून उभारलेला कारखाना असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना वरदान ठरला आहे. शेतकऱ्यांसाठी उभी हयात खर्ची घालून कारखाना उभारण्याचं पुण्याचं श्रेय चेअरमन सुरेश बिराजदार यांना जात. जिल्ह्यात असा निष्कलंकनेता मिळणे कठीण आहे. कारखान्याच्या पुढील प्रगतीमय वाटचालीस आम्ही शुभ आशीर्वाद देतो असे प्रतिपादनह. भ. प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
ह भ प सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी संचालक मंडळाचे कौतुक करत कारखान्याच्या पुढील वाटचालीस आशीर्वचन दिले.क्युनर्जी चे संचालक सचिन सिनगारे यांनी आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर कारखाना चालवतो. आम्ही काटा मारत नाही हे अभिमानाने सांगतो, प्रत्येक वर्षी आम्ही इतर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक दर देतो. याही वर्षी आम्ही सर्वाधिक दर देऊ असे बोलताना मत व्यक्त केले. तर चेअरमन सुरेश बिराजदार यांनी बोलताना दोन्ही सद्गुरूंच्या चरणांनी ही भूमी पवित्र झाली आहे.कारखान्याची कार्यक्षमता ६ हजार मे.टन इतकी वाढवण्यात आली असून कारखान्यातून उपपदार्थ निर्मिती अंतर्गत इथेनॉल निर्मिती यावर्षी पासून चालू होणार आहे . याचा फायदा भावाच्या स्वरूपात मिळणार आहे.
६ लाख मे .टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे.भाऊसाहेब कारखान्याने परिसरातील कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर वेळेत देण्याचे सातत्य राखले आहे. दोन दिवसात गाळपास सुरुवात करणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील व परिसरातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही . असे मत व्यक्त केले.
यावेळी .राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अँड. श्रीकांत सूर्यवंशी, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगीराज पाटील, राजेंद्र भोसले, कारखान्याचे संचालक राजेंद्र माने, गोविंदराव साळुंके, युवराज कदम, तुकाराम बिराजदार, देविदास जाधव, व्यंकटराव सोनवणे, इमाम पटेल, साहेबराव पाटील, योगीराज स्वामी यांच्यासह माऊली आनंदगावकर, किशोर साठे, डॉ. मल्लिनाथ मलंग, उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, संजय पवार, अॅड. सयाजी शिंदे , लोहारा उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक जालिंदर कोकणे, नागन्ना वकील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष नानाराव भोसले, शंकर वाडीकर ,अशोक कारभारी, विठ्ठल पाटील, रफिक पटेल, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड, मारुती पाटील, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे ,भीमा स्वामी, अतुल जगताप ,गोविंद देवकर ,खंडू पाटील ,रवी पाटील, भूकंपग्रस्त प्रतिकृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, शिवाजी पाटील, शमशोद्दीन जमादार, प्रकाश सुभेदार, दत्ता इंगळे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.