दि 3 जानेवारी
स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणा हि काळाची गरज असुन त्यांच्या कार्य त्यागानेच आज पत्येक महिलेस प्रेरणा व स्फुर्ती मिळत आहे तसेच त्यांनी केलेला त्याग आणी स्त्री शिक्षणाच्या क्रांक्ती मुळेच आज समाजात स्त्रीयांना उच्चतम स्थान मिळत असुन पुरुषा बरोबरच स्त्रीया हि आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवरच आहेत कारण महीला शिकली पाहीजे ती चुल आणी मुल एवढ्याच मर्यादेत जखडुन न रहाता सर्व क्षेत्रांत पुढे गेली पाहीजे या समग्र दृष्टीकोनातुन सावीत्री बाई फुले यानी तत्कालीन काळात आणी अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करत स्त्रीयाच्या उन्नती साठी लढा दिला आणी त्याच लढ्यामुळे आज समाजात स्त्रीयां खंबीर पणे स्वताच्या पायावर उभ्या राहुन पुढाकाराने सर्व क्षेत्रात काम करत आहेत अशा सर्व स्त्रीयांना बरोबर घेऊन आपण काम केल पाहीजे असे प्रतिपादन संकल्प महिला ग्राम संघाच्या प्रमुख सौ मनिषा मोहळकर यानी संकल्प महिला ग्राम संघ कार्यालया च्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या सावीत्री फुले यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमा दरम्यान केले यावेळी बहुतांश महिला गटाच्या अध्यक्षा सचिव तसेच महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या यावेळी सावीत्री फुले याच्या प्रतिमेची विधीवत पुजा करत महिलांनी हळदी कुंकु वाहत पुष्पहार घालुन सावित्री फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले
जामरवेड प्रतिनिधी नंदु परदेशी