पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले.

आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

*जामखेड । प्रतिनिधी नंदुपरदेशी

जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते,तर मी येथे उभा दिसलो नसतो. पहिल्या पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले. तेथून जी सूरूवात झाली.ती इथपर्यंत झाली.त्यामुळे जवळा गाव माझी कर्मभूमी असल्याची भावना आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केली.

आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे उपसरपंच प्रशांत शिंदे मित्र मंडळाच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अमीत चिंतामणी, उपसरपंच प्रशांत शिंदे , भाजपा वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ.दिपक वाळुंजकर, सरपंच सुशील आव्हाड, सदस्य राहूल पाटील, काकासाहेब वाळुंजकर, सुभाष रोडे, नितीन कोल्हे , हरिदास हजारे, सावता हजारे, पांडुरंग शिंदे, भाऊ महारनवर, अनिल हजारे , महेंद्र खेत्रे, पांडुरंग रोडे, मुंजेवाडीचे सरपंच बाबासाहेब महारनवर, राजाराम सूळ,दत्तात्रय हजारे डाॅ.ईश्वर हजारे, वैभव हजारे यांच्यासह मोठया संख्येने लोक उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, जवळा गावाने मला भरभरून दिले आहे.त्यामुळे जवळा गावातील माणसाला कधी काही सांगायचे किंवा निवेदन देण्याची गरज पडली नाही.कोणते काम सांगितले आणि झाल नाही, अस कधी झाले नाही.न सांगता भरपूर निधी दिला आहे. जवळेश्वर मंदिर देवस्थानाच्या विविध विकास कामांसाठी निधी द्या असे कोणीही निवेदन दिलेले नाही.मात्र दिड कोटी रूपयांचा निधी दिल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश महाराज बोधले म्हणाले, राम शिंदे हे खूप नबीबवान असून, त्यांनी संघर्षातून उत्तंग शिखर गाठायचे काम केले असल्याचे गौरोदगार काढताना, घरचा आणि घरातला आमदार काय असतो.हे राम शिंदे यांनी दाखवून दिले आहे. जामखेड तालुका हे राम शिंदे यांचे माहेर आहे.भाऊ असेल तर बहिणीच्या उतरंडीपर्यंत जाऊ शकतो.मात्र पाहूणा असेल, तर ओसरीलाच बसेल. असे उदाहरण त्यांनी दिले.

उपसरपंच प्रशांत शिंदे म्हणाले, आ शिंदे यांनी जवळा गावासाठी मोठा निधी दिला असल्याचे सांगत, गेल्या काही वर्षात वेगळे अनूभव आले. आम्ही तरूण कार्यकर्ते आहोत. काही चूका होत असतात.आम्ही आ शिंदे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे जवळा ग्रामपंचायत निवडून आणून परत भाजपामध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.जवळा येथील संत सावता महाराज सभामंडपासाठी भरीव निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *