प्रतिनिधी
उमरखेड :-उमरखेड येथे अतिरीक्त जिल्हा व सत्रन्यायालय तात्काळ सुरु करण्यासाठी या आंदोलनात उमरखेड शहर व तालुक्यातील जनतेने सुद्धा पुढाकार घ्यायला हवा सेशन कोर्ट पुसदला असल्याने जनतेला आर्थिक भूर्दंड सोसवा लागतो ,भरपूर वेळ वाया जातो , आमच्या शहरात सुद्धा विधी तज्ञांची (वकील )मोठी संख्या उमरखेड – महागाव तालुके भौगोलकि दुष्टया फार मोठे असल्याने येथे सत्र न्यायालयान परवडणारे आहे दोन्ही तालुके सुख सुविधेने सक्षम आहे . हे सर्व काही माहित असताना देखील पुसद शहराचे वकील संघ जाणीव पुर्वक आंदोलनाचा पवित्रा घेवून राजकिय पुढाऱ्यांची भेटीगाठी घेत आहेत जेणे करून सत्र न्यायालय पुसद येथे राहावे पुसद येथे राजकिय पावर अधिक असल्याने उमरखेड – महागाव तालुक्यातील जनतेवरअन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा लढा फक्त वकीलांचा किंवा न्यायालय संबधी कारकूनचा नसून सर्व सामान्याचा आहे या करिता वेळ प्रसंगी कायदेशीर जनआंदोल देखील करावे लागेल तसेच आमच्या विभागाचे राजकिय पुढार्‍यांनी यात पुढाकार घेवून शासन दरबारी प्रलंबीत अतिरीक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या जमिन अधिग्रहनाच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरीसाठी प्रयत्न करावे आणि उमरखेड – महागाव मतदार संघातील जनभावनेचा विचार व सुविधेचा विचार करून शक्य तितक्या लवकर उमरखेड येथे सत्र न्यायालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहान रसूल पटेल
माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिव्हील राईट्स यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *