उमरखेड (ता. ३१ ) हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथे दि. ३० डिसेंबर रोजी दोन गटात शुल्लक कारणांवरून दगडफेक झाल्यामुळे उमरखेड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी घटनास्थळी खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने धाव घेऊन विलास मुळे यांच्या घरी भेट दिली व लग्न शांततेत पार पाडा असे सांगून दगडफेकीमध्ये जखमी झालेले पोलिस निरीक्षक श्री राठोड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली. दोन्ही गटांची भेट घेत शहरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे याबाबत आवाहन केले.
उमरखेड येथे दि. ३० डिसेंबर रोजी लग्नाच्या मिरवणुकीत शुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाल्यानंतर वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले . यामुळे काही काळ शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी हिंगोली येथील नियोजित दौरा रद्द करून तातडीने उमरखेड येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवून सुव्यवस्था कायम राखावी याबाबत सूचना केल्या.
दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत स्वामी मठ ,दादू मिया दर्गा येथे भेट दिली. तसेच पोलीस प्रशासनास याबाबत सूचना देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी या घटनेत जखमी झालेल्या काही पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच शहराच्या ज्या भागात हि घटना घडली त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व कोणीही घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहारत शांतता व सलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी शहर प्रमुख अतुल मैड, भाजपा शहर प्रमुख अजय बेदरकार ,युवासेना शहर प्रमुख जस्विन घनघाव,अक्षय पवार,सुनील घोडे, प्रियेश ठाकूर,विकी जोशी,सोनू फुलारी,अंकुश खाडे,साई महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.
