हिंगोली लोकसभा मतदार संघात मागील आठवडाभरापासून आवकाळी पाऊस सुरुच आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, केळी, कापूस अशा नगदी पिकांसह सोयाबीन, तूर, ज्वारी व पालेभाज्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी मागणी केली आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली शहरासह, वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, हिमायतनगर, किनवट, माहुर, हदगाव यासह उमरखेड आणि महागाव विधानसभा क्षेत्रातील ११ तालुक्यातील हजारो हेक्टर शेतपिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याचे सांगितले. त्यानंतर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १८० कोटी रुपये लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *