धाराशिव : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शहरातील बाजार पेठेतील छ. शिवाजी महाराज चौक येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष सुनंदाताई माने, जिल्हा सचिव मिराताई भोसले चव्हाण, अरुण जगताप, मराठा सेवा संघाचे शांतकुमार मोरे, उद्धव मुळे, कृष्णा तळीखेडे, शहरप्रमुख योगेश तपसाळे, सचिन शिंदे, मनोज जाधव, विनोद कोराळे, गोविंद दंडगुले, अशोक पतगे आदी जण उपस्थित होते.
सचिन बिद्री