Traffic diversion
बुधवारी (दि.24) पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे.
पुणे : अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील. वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळयाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील. पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी धानोरी लोहगाव वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.
मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे, तरी वाहनचालकांनी वर नमुद वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
अबरार शेख
8806336600