जामखेड येथील सनराईज मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटल चे संचालक डॉ संजय भोरे यांची भाजपा जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
या अगोदर मा आ. प्रा. राम शिंदे साहेब यांची २००७ मध्ये जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष निवड झाली तेव्हा डॉ संजय भोरे हे जामखेड तालुका डाॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष होते त्यांचे वैद्यकीय ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम पाहुण त्यांनी डॉ संजय भोरे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली होती तेव्हा पासून ते डॉ संजय भोरे हे आ प्रा राम शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी आहेत
डॉ संजय भोरे १९९२ पासून सामाजिक क्षेत्रात काम करतात व १५ आॅगस्ट १९९४ पासून वैद्यकीय क्षेत्रात प्रयत्न हाॅस्पिटल च्या माध्यमातून रुग्णांना सेवा देतात
१९९५ साली शैक्षणिक संस्थेची स्थापना केली व त्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करतात व त्या अंतर्गत पाडळी फाटा येथे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय , स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेज, सनराईज इंग्लिश स्कूल, देवदैठण येथे संभाजीराजे ज्युनियर काॅलेज तसेच कुसडगांव येथे स्व विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय च्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व सामान्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात
डॉ संजय भोरे हे २००१ ते २०१० या कालावधीत ते जामखेड तालुका डाॅक्टर असोसिएशन चे सचिव व अध्यक्ष होते , तसेच ते जामखेड तालुका शिक्षण संस्था संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, जिल्हा प्रतिनिधी होमिओपॅथिक डाॅक्टर फोरम
त्यांना आत्तापर्यंत राष्ट्रीय विकास रत्न गोल्ड अॅवॉर्ड दिल्ली, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलिनियम अॅवॉर्ड नेपाळ ( काठमांडू)
इंदिरा गांधी सदभावना अॅवॉर्ड दिल्ली असे अॅवॉर्ड मिळाले आहेत
