जामखेड तालुक्यातील नान्नज व पंचक्रोशीतील सर्व सामान्य महिलांना बरोबर घेऊन बचत गट ग्रामसंघ अथवा उमेदच्या माध्यमातुन सि टी सी सौ मनिषा अर्जुन मोहळकर ह्या नेहमी विविध सेवा भावी व रोजगार पुरक उपक्रम राबवत महिलांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत

त्यातच सालाबाद प्रमाणे गतवर्षीही रथ सप्तमी निमीत्त आयोजीत त्यांच्या सार्वत्रीक हळदी कुंकु कार्यक्रमामुळे अनेक महिलांना प्रेरणा स्फुर्ती मिळाल्याने असंख्य महिलांनी आपला उर्स्फुत प्रतिसाद नोदवत हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी केला तसेच सर्व महिलांच्या सहकार्य व मनिषा मोहळकर यांच्या सकल्पनेतून हळदि कुंकु कार्यक्रमा नंतर नुतन सी एस् सी सेंटर व लेडीज टेलरीग शॉपीच्या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला सदर सेंटर व लेडीज टेलरिंग शॉपी ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत सुरु करण्यात आली असुन सि एस सी सेटरचे काम स्वता सौ मनिषा मोहळकर यांच्या माध्यमातून चालणार आहे तर लेडिज टेलरिंग शॉपीचे काम सौ प्रतिभा सचिन हजारे या पहाणार आहेत या उत्कृष्ट प्रगती पथावरील कार्यक्रमा मुळे सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक केले जात आहे त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना उन्नती करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मजबुत होता ना दिसत आहे

त्यामुळे महिलांचा उत्साह वाढत चालला असून पुढील काळात ग्रामीण भागातील महिला ह्या प्रगती पथावर जाऊन सर्वागीन विकास घडवतील यात शंका नाही या कार्यक्रमा वेळी अनिता मोहोळकर, स्वरूपा पंडित सरस्वती बोराटे अनिता सोमनाथ मोहलकर , मनीषा हजारे दर्शना साळवे सुनीता भवाळ धनश्री मोहोळकर मनीषा मोहकर दिपाली शिंदे स्वाती गोरे रूपाली मोहोळकर दिपाली मोहोळकर प्रतिभा हजारे सुवर्णा मलंगनेर इत्यादि उपस्थित होत्या तर याच हळदि कुंकवाच्या कार्यक्रमाचे औचीत्य साधत सौ मनिषा मोहळकर यांच्या खास मैत्रीण समजल्या जाणाऱ्या शुभांगी ताई यांनी सौ मनिषा मोहळकर यांचा वाढ दिवस साजरा करत त्यांना केक भरवुन सर्वाच्या वतीने शुभेच्छा दिल्याने सौ मनिषा अर्जुन मोहळकर सि टी सी यांनी उपस्थित महिलांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले
प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अ नगर