सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा फीस वेळेवर न भरल्याच्या कारणावरून वेळोवेळी मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बजाजनगर येथील पोलीस भरती, रेल्वे भरती, वनरक्षक व इतर शासकीय नोकरीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुड झेप अकॅडमी च्या संस्था चालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लिनाचे वडील श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्था चालक निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, व्यवस्थापक राठोड, शुभम गोंगे, वार्डन मीरा सत्वधन वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज छत्रपती संभाजीनगर.
मो.8484818400