ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा जेष्ठाच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठाना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्य तपासणी व स्वास्थ्यवर्धक उपचार मिळावेत, यासाठी मंडळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांचे विशेष प्रयत्नाने माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी द्वारा उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅव्हल्स द्वारा दिनांक 21 फरवरी, 2024 ला 47 स्त्री – पुरुष ज्येष्ठांना सोबत घेऊन एक दिवसीय कौटुंबिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
निसर्गाच्या सानिध्यात आरोग्य तपासणी व स्वास्थ्यवर्धक उपचाराचा लाभ 47 ज्येष्ठांनी घेतला. तसेच 30 ज्येष्ठांनी पंचकर्म करून घेतले. माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी यांनी ज्येष्ठाप्रती सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून बीपी, शुगर, इसीजी, एसपीओ -2 या प्रमुख तपासण्या प्रतिव्यक्ती रुपये 350/- व पंचकर्माकरिता रुपये 150/- अतिरिक्त शुल्क घेऊन ज्येष्ठांना सेवा दिली. सोबतच सर्व ज्येष्ठांकरिता चहा, नाश्ता व सुरुची भोजनाची व्यवस्था करून सेवाभावी वृत्तीने दर्शन घडविले.
डॉक्टर गौरव शेळके यांनी आजार टाळण्यासाठी मानवाचा आहार विहार व दिनचर्या कशी असावी याबाबत जेष्ठांना मार्गदर्शन केले. तसेच येथील उपचारामुळे रुग्णांचे आजार कसे बरे होतात याविषयी माहिती दिली.
या कामी हॉस्पिटलचे योगतज्ञ श्री निलेश ठाकरे व कुमारी किरण तागडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या सहली बद्दल उपस्थित ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *