जामखेड प्रतिनिधी
दि 5 मार्च
जामखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून संजयकाका कोठारी मित्र मंडळाच्या वतीने नागेश विद्यालय वस्तीग्रह येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा तालुका पत्रकार संघाचे सचिव महेश बेदरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांच्यासह , भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष नगर दक्षिण अमोल तातेड , प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण छाजेड, भारतीय जैन संघटना जिल्हा सचिव नगर दक्षिण प्रफुल्ल सोळंकी ,कांतीलाल कोठारी वैभव कटारिया वस्तीग्रह अधीक्षक नानासाहेब शिर्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रफुल्ल सोळंकी यांनी प्रास्ताविकात संजय कोठारी यांच्या सामाजिक कार्याची माहिती विशद केली तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष महेश बेदरे यांनी बोलताना सांगितले की सामाजिक कार्य आणि संजय कोठारी हे जणू आता समीकरणच बनले असून संजय कोठारी हे अपघातग्रस्तासाठी नेहमीच देवदूत ठरलेले आहेत शेकडो हजारो लोकांचे प्राण संजय कोठारी यांच्या प्रसंगावतेमुळे वाचले आहेत हे कार्य निश्चितच वेगळ्या उंचीचे असून संजय कोठारी यांनी केवळ अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले नाहीत तर मनोरुग्णांची सेवा त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था पर्यावरण संगोपनासाठी वृक्ष लागवड तसेच बेवारस मृतदेहांची देखील त्यांनी योग्य प्रकारे प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना स्पर्ध करण्यापर्यंत अतिशय मोठी सामाजिक जाणीव जपली आहे अशा सामाजिक कार्यकर्त्याला शासनाने ही दखल घेऊन पद्मश्री सारखा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी यावी यांनी केली याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उपस्थित आमचे आभार मानून आपण शेवटच्या सहसापर्यंत सामाजिक कार्य करत राहू अशी ग्वाही दिली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अहमदनगर मो नं 9765886124