जामखेड प्रतिनिधी
दि 5 मार्च
जामखेड तालुका विधी सेवा समिती, जामखेड द्वारे आयोजित राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक 03/03/2024 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, कनिष्ठ स्तर, जामखेड येथे घेण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन मा. श्री व्ही. आर. पाटील, ५ वे सह. दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अहमदनगर यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून सुरु करण्यात आले.

त्यावेळी मा. श्री व्ही. व्ही. जोशी, अध्यक्ष ता. वि. सेवा समीती तथा दिवाणी न्यायाधीश, क. स्तर जामखेड यांनी न्यायालयातील वादविवाद आपापसात मिटवुन घेण्याबाबत उपस्थीत पक्षकारांना आवाहन केले. लोकन्यायालयात प्रकरण निकाली काढल्याने कोणाचाही पराभव व कोणाचाही विजय होत नाही असे मार्मीक वक्तव्य त्यांनी त्यावेळी केले.. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, बँक व पतसंस्था यांना दाखलपुर्व प्रकरणांचाही निपटारा करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी मा. श्री ए. के. शेख, अध्यक्ष, तालुका वकील संघ, जामखेड व वकील सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी देखील उपस्थित होते.
सदर लोकअदालतीमध्ये मा. न्यायाधीशांनी केलेल्या आवाहानाला मा. श्री पि. एल. पोळ, सचिव ता. वि. सेवा, समीती तथा गटविकास अधिकारी जामखेड व वकील बांधव यांचे सहकार्य लाभल्याने पक्षकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व लोकन्यायालय यशस्वी ठरले.

सदर लोकन्यायालयामध्ये दाखल पूर्व व प्रलंबित एकुण ६,६४३ प्रकरणे निकाली निघाली असुन त्यामधुन एकुण २,०३,१७,३१८/- एवढी मोठ्या रक्कमेची वसुली झाली व जामखेड न्यायालयाने अहमदनगर जिल्हयामध्ये भरपूर प्रकरणाचा निपटारा करून प्रथम क्रमांक पटकावला. लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल मा. श्री व्ही. व्ही. जोशी, अध्यक्ष ता. वि. सेवा समीती तथा दिवाणी न्यायाधीश, क. स्तर जामखेड यांनी वकीलबांधवांचे व न्यायालयीन कर्मचा-यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी नंदु परदेशी जानखेड अहमद नगर
मो नं 9765886124