आजचे विद्यार्थी उद्याचे भावी कलाकार
तब्बल अडीच तास कार्यक्रम रंगला
दि.६ मार्च २०२४.
जव्हार नगरपरिषद राधा विद्यालयाच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.ह्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,महिला पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हेमलता जाधव, जव्हार नगर परिषद शाळेचे केंद्र प्रमुख तथा केंद्र समन्वयक एन.वाय गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पुजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.यावेळी व्यासपीठावरील पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
राधा विद्यालयाच्या इ.१ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेऊन शोभा वाढवली होती.शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुण,आविष्कार विकसित व्हावे.ह्या उद्देशाने वार्षिक स्नेह संमेलन भरविले होते.याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त ,दांडगा प्रतिसाद लाभला. ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावण्या,कोळी गीते,नाटक, गायन, ब्रेक डान्स,नकला,फ्रँन्सी पोशाख,भक्तीगीते, आदी. विविध कलागुणांनी सज्ज भावी आविष्कार साजर केले.
सिने कलावंताना लाजवेल अशा विद्यार्थ्यांचा अभिनय
वार्षिक स्नेह संमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कला ,नृत्य सादर करुन “निशाना तुला दिसला ना, केळेवाली, ओ माय फ्रेंड गणेशा, नदीच्या पल्याड आईचा गोंधळ ,नाच रे मोरा आंब्याच्या बनात, बमबम भोले, मी आहे कोळी,या या माया या, आमच्या पप्पांनी गणपती आणला, या रावजी बसा भावोजी, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, स्कुल चले हम, झुबी डुबी, माझी पंढरी पंढरी, फु बाई फू फुगडी फू आदी. अशी नृत्य साजर करुन विद्यार्थी ,पालक व श्रोत्यांची मने बालगोपाळांनी जिंकली.
तब्बल अडीच तास सुरु असलेल्या वार्षिक स्नेह संमेलनातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थी,पालक मंञमुग्ध झाले होते.ह्या कार्यक्रमाचे सुञसंचालन राधा विद्यालयाच्या शिक्षिका सौ. आरती.व्ही.देशमुख यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले तर पालकांच्या सहकार्याने,शिक्षकांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.