
पालघर -मोखाडा
नवराष्ट्र सन्मान सोहळा कार्यक्रम २०२५ च्या कार्यक्रम प्रसंगी मोखाडा तालुक्यातील काष्टी/सावर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री हनुमंत पादीर यांनी सल्लग पाच वर्ष सरपंच ,उपसरपंच पदी असताना उत्कृष्ट कामगिरी केल्याची दख्खल घेत केला वनमंत्री नामदार गणेश जी नाईक साहेबांनी सत्पात्री सन्मान केला.
यावेळी भास्कर पेरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याही ग्रामपंचायत क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण पाऊल उचलुन गावपातळीवरील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे उपसरपंच श्री हनुमंत पादीर यांनी आपल्या स्वःताच्या मालकिचे वाहन आदिवासी गरीब पिडीत रुग्णांना मोफत उपलब्ध करुन अनेक गर्भवती माता व रोग्यांच समस्या सोडविण्यासाठी व्याख्याने जोगी कामगिरी केल्याची लक्षात येते. तर स्थानिक पातळीवर तेल घाणा लाऊन ग्रामस्थांना विनामुल्य तेल उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे कुपोषणाचे समुळ उच्याटन करण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजनांची अंमलबजावणी करुन अनेक उपक्रम राबविले. तसेच वैतरणा नदीवरील पादचारी पुलाच्या माध्यमातून रहदारी खुली करण्या सारखे अनेक गावविकासात्मक कामे पुर्णत्वास नेऊन शिक्षण,निवारा,विज,पाणी,आदि सोयींनी गाव समरुध्द केल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते.
या प्रसंगी नामदार वनमंत्री गणेश जी नाईक साहेब उपस्थित होते. तर पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत जी सवरा साहेब उपस्थित असुन समवेत पालघर विभागातील अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रतिनिधी -जगन्नाथ पाटील