औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील विविध गावांत ग्रामविकास विभाग अंतर्गत 3 कोटी 54 लाख रुपयांच्या मंजूर कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखेचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात कोरोनाच्या संकटात आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासह विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट होत असून गावांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले
याप्रसंगी फर्दापूर ठाणा येथे शिवसेना व युवासेना महिला आघाडी शाखेचा नामफलकाचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला युवक शाखाप्रमुख सय्यद सलीम, उपप्रमुख सय्यद अफरोज फारूक, उपप्रमुख सय्यद अब्रार, सचिव सोपान आनंद, सहसचिव दीपक शालिक नरोटे, कार्याध्यक्ष अमजत उस्मान पठाण, सहकारी अध्यक्ष शमशुद्दीन सय्यद, कोषाध्यक्ष इद्रिष याकूब,सहसचिव सय्यद रहीम कलीम, स्वागत अध्यक्ष साहेबराव सुकडू दिंडे, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, शहर प्रमुख संतोष बोडखे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव, धृपताबाई सोनवणे, उस्मान पठाण, रविंद्र बावस्कर, विलास वराडे, सुपडू दिंडे, बाबू चव्हाण, वसंत चव्हाण, सैय्यद फारूक, शेख जाकेर, उमरखा पठाण, शाफिकखा पठाण, अरीफखा पठाण, कुणाल राजपूत, श्रावण जाधव, हिरा चव्हाण, विनोद जाधव, कृपालसिंग बातळे, राजेश दिंडे, आदींसह विविध गावातील सरपंच, शिवसेना पदाधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद