लातूर प्रतिनिधी :-
नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून शासकीय व खाजगी शाळांसाठी हे अभियान सुरू केले होते यात शाळेची गुणवत्ता, परिसर स्वच्छता, पालक व माजी विद्यार्थी सहभाग, स्वच्छता मॉनिटर अशा विविध ३० प्रश्ना खाली शाळेचे मूल्यांकन केले होते. अंतिम निवड नुसार विजेत्या शाळाना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. शाळेतील उत्तम प्रशासन, शाळेची स्वच्छता, शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळा परिसरातील स्वच्छता, शाळेतील विविध उपक्रम या विविध चाचण्यात हजरत सुरत शाह उर्दू माध्यमिक शाळा लातूर ने आपले उत्तम रित्या सादरीकरण केले.
शासनाच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेची तपासणी केली व त्या प्रमाणे आमची शाळा हे द्वितीय पुरस्कार पटकावून आमच्या शाळेने एक शासनाचा मानाचा पुरस्कार पटकावला. या अभियानात शाळे चे मुख्याध्यापक – सय्यद इनायत अली व सर्व शिक्षकांनी अत्यंत जिद्दीने मेहनत घेऊन आपले कौशल्य दाखविले. हजरत सुरत शाह एज्युकेशन सोसायटी हे नेहमीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारीरिक,बौद्धिक व सांस्कृतिक विकास हे शालेय जीवनापासून व्हावे या साठी नेहमी प्रयत्न करीत असते, या साठी नेहमी शिक्षक व विद्यार्थ्यां सोबत संस्था संचालक समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.
उत्तम प्रशासन विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे उत्तम कसे शिकविता येईल याकडे विशेष मुख्याध्यापक व शिक्षक लक्ष देत आहेत. MPSC, UPSC या विषयावर प्राथमिक माहिती देण्यात येते. लातूर जिल्ह्यातील हे पुरस्कार प्राप्त करणारी ही एकमेव उर्दू शाळा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व संचालक मंडळ विशेष लक्ष देऊन नेहमी शिक्षकांना प्रोत्साहित करत असतात असे संस्थेचे सचिव आडवोकेट फारूक शेख बोलताना म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणा सोबत विविध उपक्रम राबविले जातात तसेच गेल्या काही वर्षां पासून MPSC, UPSC बाबतीतही प्राथमिक धडे दिले जातात. भविष्या मध्येही आम्ही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
हजरत सुरत शाह उर्दू माध्यमिक व प्राथमिक शाळा सध्या लातूर शहरांमध्ये हे अल्पसंख्याक समाजासाठी एक आशेचे किरण बनलेली आहे व त्यासाठी आम्ही सर्व संस्था संचालक,शिक्षक, मुख्याध्यापक उत्तमरीत्या असे कार्य करत राहु. संस्थेच्या माध्यमातून आज प्राथमिक शाळेची ही उत्तम अशी बिल्डिंग संस्थेने निर्माण करून दिलेली आहे.
समाजाचे विद्यार्थी उत्तम रित्या या संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या शाळेत घडावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत राहु अशी ग्वाही हजरत सुरत शाह एज्युकेशन सोसायटी लातूर चे सचिव ऍड. फारूक शेख यांनी दिली.
प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529