वाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या सतरा वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे अठरावे वर्ष आहे. यावेळी स्मशानाचा संपूर्ण परिसर झाडू खराट्याने झाडून स्वच्छ करण्यात आला.

स्वच्छता अभियानानंतर दारू, बिडी, सिगारेट,गुटखा आदी व्यसनांची तसेच प्लॅस्टिक पन्या, व गाजरगवताची होळी करण्यात आली. समाजातील सर्व नागरिकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहावे हा या स्मशान होलिकोत्सव उपक्रम राबविण्या मागचा उद्देश आहे या उपक्रमाचे आयोजन संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष सुशील भिमजियाणी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड.सुरेश टेकाळे, वृषाली टेकाळे, ज्योती विष्णू इंगळे, राजाभैय्या पवार, आशिष इंगोले, रवी गुप्ता, राजू धोंगडे, प्रवीण इंगोले, अश्विन पेंढारकर, रविंद्र हजारे, राम धनगर, हर्षवर्धन टेकाळे, दिव्यश्री टेकाळे,जाफर पठाण,शाम भोंगळ,चंदू मांजरे, सुमित डोगडे आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *