section and everything up until
* * @package Newsup */?> मंगरूळपीर येथील बीडीओंकडून घरकुलाच्या कामांची पाहणी;अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश | Ntv News Marathi


वाशिम:-मंगरूळपीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे शुक्रवारी भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सोनोने यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच जे लाभार्थी घरकुलाचे काम पूर्ण करणार नाहीत त्यांच्याकडून दिलेल्या रकमेची वसुली करण्यात येईल असेही त्यांनी लाभार्थ्यांना बजावले.
यावेळी मंगरुळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश ठाकुर, संपर्क अधिकारी राम श्रृंगारे, गोलवाडी येथील सरपंच पुष्पा गुलाबराव शिंदे, माजी सभापती तथा गोलवाडीचे जेष्ठ नागरिक रमेश शिंदे, ग्रामसेविका संगिता आवारे आणि फाळेगाव येथे सरपंच जनार्धन इंगोले, ग्रामसेवक जटाळे यांची उपस्थिती होती.

विद्युतबिल आणि १० टक्के लोकवाटा भरण्याचे आवाहन:
गोलवाडी आणि फोळेगाव येथील ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन ग्राम पंचायतचे थकित विद्युत बिल आणि पाणी योजनेचा १० टक्के लोकवाटा भरण्याबाबतही माहिती देण्यात आली. याबाबत ग्रामस्थांना जागृत करण्यासाठी घरोघरी भेटी देण्याचे आवाहन बीडिओ सोनोने यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *