वाशिम: लिनेस क्लब मंगरुळपीर चा शपथविधी सोहळा व पद‌ग्रहण समारंभ नाथ हॉटेल मंगरुळपीर येथे दि. 21 गुरुवार रोजी संपन्न झाला. लिनेस क्लब च्या अध्यक्ष म्हणून सौ. चंचल खिराडे, सचिव म्हणुन नैना पाटील, तर कोषाध्यक्ष म्हणून चंदा ठाकूर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अकोला येथील लिनेस क्लब च्या प्रांताध्यक्षा स्वाती झुनझुनवाला, प्रांतीय सचिव रत्नमाला रुईकर, प्रांतीय कोषाध्यक्ष तिलोत्तमा देशमुख व रिजन चेअरपर्सन चंदा जयस्वाल तसेच मंपीर च्या माजी नगराध्यक्षा डॉ. गजाला खान या उपस्थित होत्या.


“जे का रंजले गांजले, त्यासी मानी जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा” या अनुक्ती प्रमाणे चालणाऱ्या या महीला क्लब च्या माध्यमांतून समाजातील गरजु व्यक्तीपर्यंत शक्य तेवढी मदत व आनंद पोहचविण्याचा मानस अध्यक्ष लिनेस सौ. चंचल खिराडे यांनी व्यक्त केला.बस स्टॅण्डच्या पाठीमागे पालावरील वस्तीत जाऊन क्लब च्या मेंबरसनी 5 महीलांना साडी वाटप करून होळीची भेट दिली. तसेच मुलांसाठी मनोरंजनातुन शिक्षण या उद्देशाने ड्रॉईंग बुक भेट दिले, काही छोट्या सवंगड्यासाठी शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी स्कुलबॅग भेट दिल्या. ]

महीला व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्व लिनेस सदस्य महीला व प्रमुख पाहूणे खुश झाले, खरं अर्थाने आनंदाची देवाण-घेवाण याची प्रचिती सर्वांनी अनुभवली.
कार्यक्रमाचे संचलन सौ. शितल काळे व प्रिती राऊत यांनी केले. गणेश वंदना ज्ञानकाशी इंग्लीश स्कुल च्या विद्यार्थीनी अनुष्का पवार, कल्याणी इंगळे, अंकीता मनवर यांनी सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, लिनेस क्लब च्या सदस्या भावना बाबरे, मनिषा पांडे, रंजना बोरकर, गायत्री बोरकर, प्राची भोयर, वर्षा परळीकर, स्मिता भगत, प्रिती मनवर, सोनाली तायडे, विशाखा भगत, स्नेहल देशमुख, आश्विनी मिसाळ, गिता वोरा, रचना मेहता, अनुजा सोळंके, दिपा येवले, निशा गावंडे, या उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन गिता वोरा योनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *