शाळा आणि ग्राम पंचायतचीही केली पाहणी..!

वाशिम :- मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी वाशिम तालुक्यातील काटा व मालेगाव तालुक्यातील झोडगा बु येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली व चिमुकल्या बालकांशी संवाद साधला. तसेच जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतलाही भेट दिली. भेटीदरम्यान जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्राची रंगरंगोटी करून त्यांना बोलके करण्याबाबत इमारतींची पाहणी केली आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपअभियंता व शाखा अभियंता यांना दिशा निर्देश दिले.

अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना अंकज्ञान, पक्षी, प्राणी व रंगज्ञान तसेच इतर बाबतीतही प्रश्न विचारले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अंगणवाडीचे आहार पाककृती आणि स्टॉकबुक व प्रत्यक्ष उपस्थिती याची पडताळणी केली.

दैनिक उपस्थितीचे प्रमाण खूप कमी आढळले, यानंतर जिल्ह्यामध्ये भेटीदरम्यान 80% पेक्षा उपस्थिती कमी आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविका मदतनीस व संबंधित तालुक्याचे पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाही करण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले. ग्रामपंचायत इमारतीची पाहणी करून ग्रामसेवकांनी ठरवून दिलेले उपस्थितीबाबतचे वेळापत्रक योग्य- दर्शनी ठिकाणी लावण्याबाबत सुचना दिल्या.

अंगणवाडी केंद्रातील सॅम,मॅम बालकांची माहिती घेऊन त्यांचे वर उपाययोजना करण्याबाबतही सूचना दिल्या. जिल्ह्यातील दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची दुरुस्तीचे काम 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागाला व बांधकाम विभागाला सुचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला ठरवून दिल्यानुसार ग्रामसेवकांच्या कामकाजाचे वेळापत्रक फलक दर्शनी भागात लावले की नाही याची खात्री करुन अहवाल सादर करण्याबाबत पंचायत विभागाला सूचना देण्यात आल्या.

भेटी दरम्यान महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उप अभियंता अशोक उगले, बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख, विस्तार अधिकारी मदन नायक, अनिल उल्हामाले, काटा ग्राम विकास अधिकारी दशरथ राठोड, झोडगा ग्राम सचिव वैद्य, पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, गट विकास अधिकारी बी ए अवगण, कनिष्ठ अभियंता टी टी जाधव यांची उपस्थिती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *