वाशिम:- सौ पूनम आकाश सावळे वय 20 वर्ष राहणार उंबर्डा बाजार ही गरोदर माता उंची ४ फूट ५ इंच(१३६सेमी) दिनांक २०मार्च रोजी प्रसूती साठी ग्रामीण रुग्णालयात भरती झाली.सामान्यतः १४०सेमी पेक्षा उंची कमी असेल अशा गरोदर मातेला सीजेरियन द्वारेच प्रसूत करावं लागतं असे असून देखील या मातेची ग्रामीण रुग्णालय मंगरूळ पीर येथे नैसर्गिक रित्या प्रसूती करण्यात आली. यासाठी स्त्री रोग तज्ञ डॉ घुनागे मॅडम व अधीपरीचारिका किरण भगत यांनी प्रयत्न केले आणि २.५किलो वजनाची गोंडस नवजात कन्या जन्माला आली. अशा कमी उंचीच्या गरोदर माता ह्या अति जोखमीच्या माता म्हणून मानल्या जातात अशा कमी उंचीच्या गरोदर मातेला सिजर शिवाय पर्याय नसतो आणि खाजगी दवाखान्यात याला कमीत कमी 50 हजार मोजावे लागतात अशा वेळेस गोरगरीब रुग्णांसाठी सरकारी दवाखाना देवदूत ठरतो .यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे दर महिन्याला 40 ते 50 नॉर्मल प्रसुती होतात तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया १२ अठवड्या पर्यंत गर्भपात करणे यासाठी डॉक्टर रूच घुनागे स्त्रीरोग तज्ञ म्हणून मागील तीन वर्षा पासून अविरत सेवा देत आहे तसेच गरोदर मातेची संपूर्ण काळजी व नैसर्गिक प्रसूती घेण्यासाठी सदैव तत्पर असतात. प्रसूतीनंतर बाळासाठी लहान मुलाचे डॉक्टर सुद्धा तेवढेच गरजेचे आहे यासाठी स्वतः ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्रीकांत जाधव हे स्वतः बालरोग तज्ञ असून लहान बाळाची काळजी घेतात. कमी वजनाचे बाळ ,जन्मता कावीळ, यासाठी फोटोथेरापी युनिट सुद्धा कार्यान्वित आहे . जन्मलेल्या कण्यारत्न व तिच्या मातेची पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206