वाशिम:-जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्ह्यातील आशा सेविकांनी भरीव योगदान दिले असून त्यांच्या या योगदानामुळे वाशिम मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्याची “आशा” निर्माण झाली आहे.

आतापर्यंत त्यांनी तब्बल दोन लाख आठ हजार घरावर मतदान जागृती बाबतचा संदेश लिहिला आहे. त्यांच्या कामाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतली असून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन आशा स्वयंसेविका मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लोकांचे समुपदेशन करीत आहेत तसेच भेट दिलेल्या कुटुंबांच्या दरवाजावर याबाबत संदेश लिहीत आहे. या संदेशामध्ये
“मतदान हे दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा अधिकार आहे, तो अधिकार बजवा” असा मजकूर लिहिला जात आहे. या माध्यमातून आशा स्वयंसेविका गावकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करीत आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
वाशिम 52730
मालेगाव 30324
रिसोड 37021
मंगरूळपीर 31373
कारंजा 27500
मानोरा 29055
एकूण: 208003

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *