वाशिम:-उमेद अभियान संपूर्ण महाराष्ट्र महिलांच्या सक्षमीकरण करीता जिल्हा परिषद स्तरावर काम करत असून मतदान जनजागृती अभियानात मतदार जागृतीच्या चिठ्ठ्या वाटून उमेदच्या महिलांनीही भरीव योगदान दिले आहे.
उमेद च्या सीआरपी महिला महिलांनी दिलेल्या चिठ्ठ्या पाहून गावामध्ये “जिल्हा परिषदसे चिठ्ठी आई है, मतदान करने की घाई है” असे वातावरण निर्माण झाले होते.


सद्य स्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि प्रकल्प संचालक किरण कोवे यांच्या मार्गदर्शन उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच गाव पातळीवरील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती मार्फत मतदान जनजागृती अभियान राबवून जवळपास पावणे दोन लाख चिठ्ठ्यांमार्फत मतदान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. सदर अभियानातील जिल्हा ते गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व CRP मार्फत रागवलेल्या उपक्रमामुळे नक्कीच मतदान टक्केवारी मध्ये मागील वेळ पेक्षा वाढ होईल असा विश्वास विरिष्ठ अधिकारी यांनी दर्शविला आहे.

उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व CRP मार्फत खालील प्रमाणे घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करीता म्हणीच्या छोटे पोम्प्लेट/ चिठ्ठी वाटप केल्या, त्याचा तपशील खालील प्रमाणे:

वाशिम – 24810
कारंजा – 23500
मनोरा – 24960
रिसोड – 23800
मंगरुळपीर – 24100
मालेगाव – 23600
एकूण: 144770

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *