खर्डा: जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त रमाई युवा मंच सातेफळ जयंती साजरी करून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी दैनिक लोकमत प्रतिनिधी संतोष थोरात यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार , साहित्यिक, बौध्दाचार्य आदर्श शिक्षक गोकुळ गायकवाड यांना सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व धम्म कार्यातील योगदानाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाहीर बाबासाहेब राजगुरू यांना


शिव ,फुले, शाहु आंबेडकर चळवळीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर भीमशाहीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यिक वाटप करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली. शाहीर बाबासाहेब राजगुरू यांनी शाहिरीतून समाज प्रबोधन केले. गोकुळ गायकवाड यांनी सर्व उपस्थित महिलांना उद्देशून रमाई, भिमाई जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे आवाहन केले. पालकांनी छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचा इतिहास जाणून आत्मसात करावा असे मौलिक मार्गदर्शन.
यावेळी सरपंच गणेश लटके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, संदेश घायतडक यांच्या सह कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमाई युवा मंच सातेफळ चे ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ सदाफुले , अजित सदाफुले, अशोक सदाफुले, तुषार सदाफुले, राहुल सदाफुले, सोनबा सदाफुले, समाधान सदाफुले, लक्ष्मण सदाफुले, राम घोडेराव, दिपक सदाफुले, भाऊसाहेब सदाफुले,शाहू सदाफुले, नीळकंठ सदाफुले, दादा मोरे, विजय सदाफुले,बाबू सदाफुले, स्वप्निल सदाफुले, जालिंदर सदाफुले, नितीन सदाफुले, दगडू सदाफुले, बबन घोडेराव, भानुदास मोरे, दिलीप सदाफुले, संतोष सदाफुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
विकास पाचरणे यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन बबन सदाफुले यांनी मानले.

नंदु परदेशी
एन टी व्ही न्युज जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *