हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेल्या व २०२४ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आष्टा येथे उद.या दि १ रोजी सायंकाळी ६ वाजता आष्टा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार असल्याची माहिती आष्टा शहराध्यक्ष सुदर्शन वाडकर , नितिन चौगुले, अरूण कवठेकर , अभयकुमार मंजुगडे आदींनी दिली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विविध पक्ष संघटना यांचा पाठिंबा राजू शेट्टींना मिळत असल्याने राजू शेट्टी नेमके काय भाष्य करणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.