रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषी विभागाचा आत्मा तर्फे शेतकरी गट, महिला शेतकरी गट, अन्न प्रक्रिया उद्योजक महिला गट तसेच गटातील सदस्यासाठी कार्यशाळेचे आयोजन कोहिनुर कॉलेज सभागृहात करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकाश वाकळे तालुका अध्यक्ष भा. ज .पा.,पंचायत समिती सदस्य पती प्रकाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले ,प्रसंगी प्रास्ताविक आत्माचे प्रदीप पाठक यांनी केले तसेच मंडळ कृषि अधिकारी विजय नरवडे यांनी योजनेचा मूळ उद्देश सांगितला प्रसंगी प्रकाश वाकळे यांनी शेतकरी यांनी शेती सोबत शेती निगडित कुटीर उद्योग उभारून आर्थिक उन्नती करून घ्यावी व सक्षम व्हावे शासकीय योजना मध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा व योजना समजून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा ,सेंद्रीय पद्धतीने शेती करून रासायनिक खताचा वापर टाळावा असे सांगितले , तालुक्यातील असे कुटीर उद्योग करणारे महिला शेतकरी पुसे ताई ,मसाला निर्मिती करणारे संतोष कांगुलकर ,हळद व भाजीपाला पीक घेणारे दत्तू काका धोत्रे ,सेंद्रिय शेती करणारे जानकीराम नलावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अनुदान ची पद्धती अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन व ऑफलाईन पद्धत, बँकेत प्रस्ताव दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे व अनुदानाचे निकष व निवड बाबत सर्व माहिती पवन काबरा यांनी सविस्तर सांगितले प्रसंगी कृषि विभागातील सर्व कृषि कर्मचारी आत्मा कर्मचारी तालुक्यातील महिला गट सदस्य व शेतकरी गट तसेच उमेद अभियान कर्मचारी उपस्थित होते आभार प्रदर्शन आत्माचे प्रदीप पाठक यांनी केले.
औरंगाबाद,खुलताबादN टीव्ही न्यूज मराठी योगेश शेळके
Skip to content