section and everything up until
* * @package Newsup */?> जामखेड खर्डा रस्त्यावर एसटी बस आणि कारच्या भीषण अपघातात तीन ठार तर दोन जखमी. | Ntv News Marathi

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची अपघातग्रस्तांना तातडीने मदत.

जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डा रस्त्यावरील बटेवाडी शिवारात एसटी बस व कारचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू ,तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे (वय २४ वर्षे), पंकज सुरेश तांबे (वय २४ वर्षे), मयूर संतोष कोळी (वय १८ वर्षे) अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत. तर सचिन दिलीप गीते (वय ३०), अमोल बबन डोंगरे (वय २८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, एमआयडीसी येथील रहिवासी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.

जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात कोल्हे पेट्रोलपंपाजवळ जामखेडकडून खर्ड्याच्या दिशेने जाणारी कोपरगाव आगाराची कोपरगाव ते हैदराबाद जाणारी एसटी बस ( क्रमांक एम एच ०९ एफ एल १०२७) हे (चालक सचिन विष्णू राऊत ( वय ३८ वर्षे, बॅच नंबर ८५५१) या बसचा आणि खर्ड्याकडून जामखेडच्या दिशेने येणारी शेरोलेट बीट कार ( क्रमांक एम एच १६ ए टी ६४९२) या वाहनांची समोरासमोर धडक होवून, भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या कारमधील पाच जणांपैकी दोन जण जागीच ठार झाले. तर एकाचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान अपघातातील तीन गंभीर जखमींना शहरातील पन्हाळकर हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलला पाठविलेले होते. जखमींवर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता कायम

रात्री साडेबाराला फोन आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी रूग्णवाहिका घेऊण घटनास्थळी.
——————————————
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी रात्री साडेबारा वाजता फोनवर अपघाताची माहिती दिल्यानंतर कोठारी यांनी रात्रीची वेळ असतानाही तत्परता दाखवत तातडीने आपली रूग्णवाहिका घेवून घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृत व गंभीर जखमींना कोठारी यांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले.
गेल्या महिन्याभरात अपघाताच्या पाच घटना घडल्या. या पाचही वेळेस पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अपघातातील जखमींना मदत करण्याबाबत फोन केल्यानंतर, कोठारी त्वरित घटनास्थळी दाखल होवून अपघातग्रस्तांना मदत केली होती.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *