प्रतिनिधी नळदुर्ग
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची मुंबई येथे
पदोन्नती झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी उशिरा प्राप्त झाला.
स्वप्निल लोखंडे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळत असताना अनेक गुन्ह्यांची उकल केली.
यांच्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तपास करताना लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शहरातील व परिसरातील अत्याचार प्रकरणीदेखील त्यांनी तातडीने तपास केला होता. त्यामुळेच संशयित आरोपी काही तासांमध्येच पोलिसांच्या हातात सापडला. त्याची दखल घेत सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुकही केले.
नळदुर्ग परिसरातील अनेक घरफोड्या, चोऱ्या व अन्य गुन्ह्यांतील आरोपींचा छडा त्यांनी लावला आहे.
परिसरात सुरू असलेले अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले त्यांच्या माध्यमातून उचलण्यात आले..
सराईत गुन्हेगारांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम यांच्या माध्यमातून करण्यात आले.
शहरामध्ये काहीजण दोन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना खाकीची धाक दाखवली शहर शांतता आणि अबाधित राखण्यासाठी अनेक जनाचे समज मध्ये आणि गैरसमज काढून दोन समाजामध्ये शांतता ठेवण्याचं काम करण्यात आले
पदभार स्वीकारल्यापासून उत्तमरीत्या कामगिरी केल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या कामाची कौतुक करून सन्मानित करण्यात आला.