section and everything up until
* * @package Newsup */?> 6 जुन ते 15 ऑगस्ट: शिवराज्याभिषेक ते स्वातंत्र्यदिन | Ntv News Marathi

वाशिम जिल्ह्यातील ओडिएफ प्लस गावे ‘मॉडेल’ करण्यासाठी विशेष मोहिम

फुलचंद भगत
वाशिम:-दि.6 जून (शिवराज्याभिषेक दिन) ते 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) यादरम्यान जिल्ह्यातील ओडिएफ प्लस गावे मॉडेल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू हे या मोहिमेची अंमलबजावणी करीत आहेत.
या अंतर्गत तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच रिसोड, मानोरा आणि मंगरूळपीर या तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. शुक्रवारी कारंजा तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक घेण्यात येणार असुन पुढच्या आठवड्यात वाशिम आणि मालेगाव तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

ओडिएफ प्लस गाव ‘मॉडेल’ करण्यासाठी या बाबी आवश्यक:

  1. घरोघरी वैयक्तिक शौचालय
  2. सार्वजनिक कंपोस्ट पिट
  3. सेग्रीगेशन शेड
  4. घंटागाडी
  5. वैयक्तिक खतखड्डे
  6. सार्वजनिक कचराकुंड्या
  7. सांड पाण्यासाठी नाली
  8. वैयक्तिक शोषखड्डे
  9. सार्वजनिक शोषखड्डे
  10. स्थिरिकरण तळे
  11. वैयक्तिक परसबाग
  12. सार्वजनिक शौचालय
  13. गावात जनजागृती संदेश
  14. सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन

गावातील स्वच्छता नजरेत भरावी: सीईओ वैभव वाघमारे

गाव जर ओ. डी. एफ. प्लस असेल म्हणजे शंभर टक्के हागणदारीमुक्त असेल, स्वच्छ असेल तर डोळ्यांनाही तसे दिसले पाहिजे. गावाची स्वच्छता नजरेत भरली पाहिजे. यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याबरोबरच गावाततील स्वच्छाग्रही, ग्राम स्वच्छता निगरानी समितीने पुढाकार घ्यावा.
-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *