अहमदनगर जिल्ह्यात असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण गुरुवारी (ता.२५) सायंकाळी सहा वाजता क्षमतेच्या निम्मे भरले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणात १२९८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तर कोतूळ येथील आवक ९५४५ क्युसेक आहे. नगर पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी ही माहिती दिली.
सर्वाधिक आवक
२१ जूलैपासून धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत गेली. या पाच दिवसात धरणात तब्बल ३७६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढल्याने धरण निम्मे भरले. काल सकाळी दहा वाजता कोतुळ येथील आवक 16 हजार 750 क्युसेकने सुरू होती. दुपारी सव्वाबारा वाजता ही आवक २४४५२ तर सायंकाळी सहा वाजता आवक २५८२८ क्युसेकपर्यंत वाढली. या हंगामातील ही सर्वाधिक आवक होती. मागील ४८ तासात मुळा धरणात ९२२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले.