साहित्यरत्न लोकशाहीर,शिवशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे, यांनी अती तळाजाळातील,गोरगरीब,कामगार,कष्टकरी,लोकांच्या न्ययहक्कासाठी जिवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा दीला.समाजाचे वास्तववादी चिञ,आपल्या लेखणीमधुन मांडुन न्याय देण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्र्ट चळवळीतुन त्यांच्या राष्र्ट कार्यचे दर्शन होते.आपल्या साहीत्यातुन जगभर भारताचे नाव उज्वल केले. मग “अशा पुरुषाला भारतरत्न पुरस्कार का मिळु नये? जर भारतरत्न पुरस्कार,गायनासाठी,खेळासाठी मिळत असेल तर ज्या महापुरुषांनी गोरगरीब जनेसाठी समाजकार्य केले अशा अण्णाभाऊना पुरस्कार मिळालाच पाहीजे! अशी मागणी करण्यासाठी उमरखेडचे समाजसेवक श्री शेवंतराव गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे औचित्य साधुन ” *एक पञ ,भारतरत्न” हा ऊपक्रम सुरु केला. या ऊपक्रमातुन समाजातील सर्व नागरीकांनी राष्र्टपती,पंतप्रधान,मुख्यमंञी भारत सरकारला पाठउन “डाँ. अण्णाभाऊ साठे” यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणुन मागणी करण्याचे अव्हान यावेळी शेवंतराव गायकवाड यांनी केले.
“जोपर्यंत अण्णाभाऊना भारतरत्न पुरस्कार” मिळणार नाही तो पर्यंत सरकार दरबारी पञाचा पाऊस सुरु राहीन….!
“प्रत्येकांनी पाठवा पञ,अण्णाभाऊना मिळालाच पाहीजे भारतरत्न”
या ऊपक्रमासाठी समीतीचे गठन करण्यात आले,समीतीमध्ये,अध्यक्ष म्हणुन शेवंतराव गायकवाड,प्रशांत ससाणे,दामोधर इंगोलै,रामदास काळे, देवानंद इंगोले,संतोष जळके,श्रीधर इंगोले,नागेश लामटीळे श्रावण जळके आदीचा समावेश आहे.