फुलचंद भगत
वाशीम:- ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ अभियान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या महिनाभरात अभियानाचा कालावधीत राबविले जाईल. त्यानंतर ५ ते १५ सप्टेंबर या काळात मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.मंगरुळपीर येथील पं.स.अंतर्गतचा शिक्षण विभागही हे महत्वपुर्ण ऊपक्रम राबवण्यासाठी सज्ज असल्याचे शिक्षण विभागाच्या निर्मला गोंदेवार यांनी सांगीतले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी २९ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत अभियानाची पूर्वतयारी करण्यात येईल, तर ५ ऑगस्टला औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरवात होईल. हे अभियान एक महिना कालावधीसाठी असणार आहे. २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व शाळांसाठी राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच विद्यार्थी, पालक यांनी प्रतिसाद दिला.या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. या अभियानामुळे अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले. चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळावी व त्यांना बाह्यजगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता, तो साध्य करता आला.पहिल्या टप्प्यातील अभियानाच्या यशस्वितेमुळे यंदा २०२४-२५ मध्येही मुख्यमंत्री ‘माझी शाळा- सुंदर शाळा-टप्पा २’ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येय-धोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण व शैक्षणिक संपादणूकसाठी ४३ गुण असे एकूण १५० गुण देण्यात येणार आहेत.
या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल, असे शासनाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.मंगरुळपीर तालुक्यातही मोठ्या ऊत्साहात शिक्षणविभागाकडुन हा ऊपक्रम राबवुन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येइल असे निर्मला गोंदेवार यांनी सांगीतले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206