-मला राजकारणात जायची इच्छा नाही,
-पण मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्हाला पर्याय काय?
-29 ऑगस्टला निवडणुकांच्या बाबतीत सर्व निर्णय होणार.
-महाराष्ट्रात किती ठिकाणी आपण निवडून आणू शकतो आणि किती ठिकाणी पाडू शकतो हे लवकरच कळेल.
-गोरगरीबांची सत्ता आत्ताच येऊ शकते. कारण आता मराठे पूर्ण ताकतीने एकवटले आहेत.
-मराठ्यांचे प्रेम आणि साथ कमी होऊ शकत नाही.
-मला कितीही खचवण्याचा प्रयत्न केला तरी मनोज जरांगे आरक्षण मिळाल्या शिवाय मागे हटत नाही.
-ज्यांना वाटते की मराठा समाज आता साथ देत नाही, त्यांनी 29 ऑगस्टला बघावं.
-मला एकट पाडण्यासाठी राज्य सरकारने सापळा रचलाय.
-फक्त मराठ्यांना विनंती आहे की एकजुटीने रहा.
-तरच पुढच्या पिढ्यांचे कल्याण होणार आहे.
-माझ्या समाजाची 10 माणसं असतील तरी त्यांच्यासाठी लढणार आणि करोडो असतील तरी लढणार.
-मराठ्यांच्या मुलांनी राजकारणाकडे जास्त लक्ष न देता आपले भविष्य घडवायला पाहिजे.
-त्यासाठीच आरक्षण मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
-सगेसोयरे याची अंमबजावणी झालीच पाहिजे.
-83 क्रमांकाला ओबीसी यादी होतीच, तसेच दोघांचे व्यवसाय सारखे असल्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत.
-माझ्या समाजातल्या मुलामुलींचे हाल मला सहनच होत नाहीत.
-आरक्षण न मिळाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे किती त्रास होतात ते बघवत नाही.
-त्यामुळे माझी तब्येतीची चिंताच करत नाही.
-मराठ्यांची ताकत कमी झालेली नाही.
-राज्यभरात आपले आंदोलन सुरू नाही.
-उगाच कुणी आडवणुक करण्याची गरज नाही.
-मराठ्यांनी एखाद्याला जाब विचारायचं ठरवलं तर मुंबईत जाऊन त्याची गचांडी धरून जाब विचारू शकतो.
-एवढी क्षमता मराठयांच्यात आहे.