⭕️ऑन मुख्यमंत्री पद
- काल मी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एकत्रच होतो आणि त्यावेळी त्यांनी देखील सांगितले की आमच्यामध्ये छोटा भाऊ-मोठा भाऊ याचा रस्सी खेच नाही आहे
- जागावाटपाची प्राथमिक बैठक पार पडली आहे
- कोणता पक्ष कोणती जागा आणि किती जागा लढवणार आहे हे देखील २५ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल
⭕️ऑन नवनीत राणा मेळघाट आभार दौरा
- नवनीत राणा जे त्या आता मेळघाटचा दौरा करत आहेत ना हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मातोश्रीवर निष्कारण तीष्ठत बसण्यामध्ये लावला होता तो वेळ इथे कारणी लावला असता तर पराभव झाला नसता
⭕️ऑन नरेश म्हस्के
- काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी एक नरेश म्हस्के एक आहेत
- म्हस्के हे खासदार झाले किंवा त्यापेक्षा पण त्यांना काही मिळाले तरी त्यांची बौद्धिक ऐपत आहे ती अजूनही चिंधी चोरखी आहे ती काय वाढत नाही आहे
- नरेश म्हस्के आपण आता वसुली भाई राहिलेलो नाही, आता आपण खासदार झालोय, त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही
- नरेश म्हस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात ते एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता बांधील नाही
- म्हस्केनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणचे स्वतः च आरशात बघून केलेलं स्टेटमेंट आहे
⭕️ऑन राज ठाकरे
- राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांच्या अपेक्षा आहे
- मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामधून ते फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य त्यांनी केले असेल
⭕️ऑन बच्चू कडू
- बच्चू कडू हे स्वतंत्र अशा शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रनेते आहेत त्यामुळे त्यांनी कुणावर काय टिका करायची हा त्यांचा प्रश्न आहे
- महायुती काही त्यांचे घर देऊन-घेऊन चालवत नाही जेणेकरुन त्यांनी महायुतीचे फार आब राखून वागले-बोलले पाहिजे त्यांना जे वाटतेय ते त्यांच्या पद्धतीने मांडत आहेत