लातूर प्रतिनिधी लातूर-. छत्रपती संभाजी नगर विभागाचे लढवय्ये शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन 2021. 22 च्या उत्कृष्ट भाषण पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई येथे आमदार विक्रमजी काळे साहेब यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल वसंतराव काळे खाजगी माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन युवराज शिंदे, सचिव गफार सय्यद,कोषाध्यक्ष राजाराम भिसे, संचालक बंडू खोसे,भाऊसाहेब भिसे, राजकुमार जाधव, दत्ता कवडे, संचालिका प्रा. डॉ. सुरेखा दाडगे, प्रा.वैशाली फुले, ज्योती तेलंगे, व्यवस्थापक राजाभाऊ सरडे, प्रा. अंकुश नाडे, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर आरडले, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ,मोहन हाके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम व्यंजने, सचिव दयानंद कांबळे, कार्याध्यक्ष शिवहर रोडगे, प्रा. उदय पाटील,सतिश हलगरकर, प्रा. नर्सिंग पाटील, नागेश स्वामी, राजकुमार मगर आदी उपस्थित होते.