♦️राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अहमदनगरमध्ये झाली आहे. याप्रकरणी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

♦️येथील 9 जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.
