खापरखेडा – स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक संघ शाखा नवीन बिना, भानेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन महिन्यापासून सुरु असलेला वर्षवासाची सांगता अश्विन (कोजागिरी) पौर्णिमेला भोजनदान व बुद्ध-भिम गितांनी झाली. सकाळी उपासक धनराज डोंगरे व कांता गजभिये यांच्याहस्ते पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. दुपारी भंते धम्मप्रिय यांच्याहस्ते परित्रणपाठ तर सायंकाळी तथागत बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाईच्या छायाचित्राला लक्ष्मण लांजेवार व अंजना मेश्राम यांच्याहस्ते सल्लागार समितीच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात येवून व भंते असीन सागरा, ब्रम्हदेश, भंते वनसारा, भंते इंडचक, चंद्रमणी फौंडेशन, भानेगांव यांनी सामुहिक वुद्ध वंदना घेतली. यावेळी दीक्षित भजन, मंडळ, छिंदवाडा, मध्यप्रदेश यांनी सादर केलेल्या बुद्ध-भिम गितांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. सामुहिक भोजनदानाचा यावेळी लोकांनी स्वाद घेतला. भारतीय बौद्ध महासभा नवीन बिना व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी तथागत बुद्धांच्या धम्म सामाजिक नैतिक आचार संहिता असून त्यावर मार्गक्रमण करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाला चिचोली-खापरखेडा ग्रामपंचायत सरपंच मिनाक्षी तागडे, भानेगांवच्या उपसरपंच सोनू बोरकर, सदस्य पुष्पा जालंधर, दर्शना बोरकर, सोनाली बागडे, सामाजिक कार्यकर्त्या वंदना कुंभारे, प्रभा तागडे, कुसुम नीलकंठ गौरकर, अर्चना विजय गौरकर, दामिनी गौरकर, महाकरुणा अतुला विहार, भानेगांव येथील कार्यकारिणी, भारतीय बौद्ध महासभेचे सचिव मुकेश बागडे, अनिल लांजेवार, नरेश डोंगरे, आनंद वासनिक, ज्ञानेश्वर ढोके, मिलिंद गौरकर, मुन्ना ढोके आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक कार्यकारिणी सहित बहुसंख्येने बाल-बालिका व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक कल्पना वासनिक, सूत्रसंचालन कोषाध्यक्ष रविंद्र ढोके तर आभार सारिका तागडे यांनी मानले.
विनोद गोडबोले नागपूर