ॲड.एन पी पाटील हे औसा तालुक्यातील जमालपूरचे रहिवासी
(सचिन बिद्री:धाराशिव)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,खा.सुप्रियाताई सुळे,आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी भवन, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात संभाजीनगर उच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ ॲड एन पी पाटील जमालपुरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
मुळ औसा तालुक्यातील जमालपूर गावचे रहिवासी असणारे अॅड. एन. पी. पाटील यांनी विधीज्ञ म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे क्रांतीकारक निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच धाराशिव जिल्ह्यातील अनेक मातब्बर लोकांना कायद्याच्या चौकटीत बसवून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा कार्य केला आहे.राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष शरद पवार गटात त्यांचा: प्रवेश झाल्याबद्दल विधानसभा निवडणूकित महाविकास आघाडीची ताकत वाढणार अशी अशा व्यक्त केली जात असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत आहेत.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्यासह, माजी मंत्री विनायकराव पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नगराळकर, माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणीस प्रा. शिवाजी मुळे, प्रदेश संघटक सचिव निळकंठ मिरकले, दत्तात्रय काकडे, सचिव सोमेश्वर कदम, प्रा.माधव गंगापुरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव भोसले गुरूजी, जिल्हा उपाध्यक्षा सौ अंजली पाटील, जिल्हा सरचिटणीस केदार काडवादे, जिल्हा सरचिटणीस ॲड विवेक बिरादार, सचिव मन्मथ कोनमारे, सचिव सौ विजया मलशेट्टी, आनंद चट पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिरीष वडजे पाटील, जळकोट तालुकाध्यक्ष नेमचंद पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव महादेव आवाळे, शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष व्यकंट हंद्राळे, युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष संतोष सारंगे, सचिन सुर्यवंशी यांच्यासह लातूर जिल्ह्यातून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.