( देवमनराव इंगोले वाढदिवस स्पर्धांचे बक्षीस वितरण ) (प्रतिनिधी नेर ) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शिरजगाव पांढरी येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला स्थानिक शिरसगाव पांढरी येथे गाडगेबाबा नगरातील अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाच्या मागे देवमनराव इंगोले यांच्या घरासमोरील पटांगणात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व देवमनराव सदाशिवराव इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आठव्या देवमनराव इंगोले वाढदिवस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते माजी मुख्याध्यापक रमेशराव भगत होते याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना जगामध्ये मोह ,माया ,मत्सर द्वेष वाढत असल्यामुळे मानवी जीवन शुष्क झाले आहे या शुष्क झालेल्या मानवी जीवनाला चालना देण्यासाठी बौद्ध धम्माची गरज आहे किंबहुना बौद्ध धम्मच मानवी विकासाला चालना देणारा मार्ग होय असे प्रतिपादन रमेशराव भगत यांनी केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई भगत होत्या तसेच रेखाताई इंगोले देवमनराव इंगोले मंचावर उपस्थित होते सकाळी भंते धम्मवंश यांच्या हस्ते परित्राण पाठ घेऊन वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कविता गायन स्पर्धा आणि डान्स स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत वर्ग आठ ते दहा यांचा गट अ व एक ते सात यांचा गट ब पाडण्यात आले होते ज्या ज्या स्पर्धकांनी गट अ व गट ब मध्ये एक दोन तीन बक्षीस मिळविले त्यांचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक 22 ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा शिरजगाव पांढरी येथील मुख्याध्यापक रवींद्र घावडे यांच्या अध्यक्षतेखाली व आसटकर सर गोटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडे सरांचं संचालन डॉक्टर मोरे यांचे प्रास्ताविक आणि वनिता इंगोले यांच्या आभार प्रदर्शनात अ गटातील पारितोषिक वितरणाचा समारंभ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा शिरसगाव पांढरी येथे संपन्न झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आमले मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक रवींद्र भांडे तायडे मॅडम व विक्रम सावरकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांच्या गट ब विभागातील विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला विजेत्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक रूपाली संदीप मलाये दुसरा क्रमांक शेजल राहुल भगत तिसरा क्रमांक आचल सतीश गव्हाणे तर गट ब मध्ये पहिला क्रमांक सम्राट सत्यपाल इंगोले दुसरा क्रमांक तेजल सुनील जयस्वाल ग्रुप डान्स मध्ये पहिला क्रमांक नूतन महेंद्र पाटील व शिवानी अमोल लोखंडे दुसरा क्रमांक श्रद्धा अरविंद सारवे तेजल सुनील जयस्वाल गौरी नरेंद्र गायकवाड तिसरा क्रमांक आर्यन सतीश यशवंते योगेश सतीश यशवंते अमन इंगळे रुद्र सुनील जयस्वाल सोहन रमेश राठोड आणि प्रोत्साहन पर बक्षीस ईश्वरी प्रवीण राठोड यांनी जिंकले कविता गायन स्पर्धा प्रथम क्रमांक सम्राट सत्यपाल इंगोले दुतीय क्रमांक ईश्वरी प्रवीण राठोड रांगोळी स्पर्धा गट अ प्रथम क्रमांक श्रद्धा अरविंद सारवे द्वितीय क्रमांक शिवानी अमोल लोखंडे तर गट ब मध्ये प्रथम क्रमांक अनुजा मनोज फरकाडे द्वितीय क्रमांक योगिता रुपेश डांगे तर तृतीय क्रमांक वेदांती रुपेश वयले तर गट क मध्ये रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक गुंजन अविनाश चौधरी द्वितीय क्रमांक समता राहुल खडसे तृतीय क्रमांक अरविका प्रफुल्ल खडसे यांना देण्यात आले