आ.ज्ञानराज चौगुले यांचे दि.29 रोजी उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल होणार..
धाराशिव : उमरगा लोहारा विधानसभा: शक्ती प्रदर्शनाला सकाळी 09.00 वाजता महादेव मंदिर उमरगा येथून सुरुवात करुन छ. शिवाजी महाराज चौक,बाळासाहेब ठाकरे चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी 03 वाजता आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौक उमरगा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रा व जाहीर सभेसंदर्भात आज दि.27 रविवार रोजी तालुका शिवसेनेची आढावा बैठक युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.बैठकीत किरण गायकवाड यांनी शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी, युवती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत शक्तीप्रदर्शन व जाहीर सभेसंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीत उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शाहूराज सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, मुरूम माजी नगरसेवक शेखर मुदकन्ना, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब पाटील, उपतालुकाप्रमुख शेखर पाटील,उपतालुकाप्रमुख बी.के.पवार, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील,उमरगा शहर प्रमुख योगेश(तात्या)तपसाळे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख भगत माळी,युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख संदीप चौगुले, युवा सेना शहर प्रमुखा अमर शिंदे,नारंगवाडी सरपंच शेखर घंटे, मळगीवाडी सरपंच सतीश सोमवंशी, कसगी सरपंच हणमंत गुरव,चिंचोली ज. सरपंच पती प्रकाश ब्याळे, माडज सरपंच पती संतोष पाटील,डिग्गी उपसरपंच संतोष कवठे,लिंगराज स्वामी,रघुनाथ गायकवाड,गुंजोटी माजी सरपंच सहदेव गायकवाड,किसन पाटील,बाळू पोतदार, प्रभू येडगे,श्रीकांत मंगरुळे,शहंशाह बिराजदार,सोमशंकर पाटील,पिंटू नाटेकरी,गणेश बंडगर,तुकाराम जाधव, धिरज इंगळे, तुरोरी माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील,ॲड.सदाशिव करके, खय्युंम चाकुरे,श्री साठे,विजय भोसले,काका गायकवाड, तुळशीदास चौगुले,प्रसाद गायकवाड, व विभाग प्रमुख गणप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन बिद्री