२८ दिवसांच्या रिचार्जमध्ये १५ दिवस नेटवर्कच नाही; बँक, शाळा, आरोग्य केंद्राचे व्यवहार कोलमडले – जिओवर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भाग व डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या सावळदबारा परिसरात ‘जिओ’ कंपनीने नेटवर्कचा हुकूमशाही चा तांडव माजवला आहे जिओ ची दादागिरी सुरू १८ गावांचे केंद्र असलेल्या सावळदबारा गावात गेल्या अनेक महिन्यांपासून जिओचे नेटवर्क सतत गायब होत असल्याने संपूर्ण ऑनलाइन यंत्रणाच कोलमडून पडली आहे.
नेमकी

काय आहे गंभीर परिस्थिती?

  1. शैक्षणिक नुकसान : गावात जिल्हा परिषद शाळा, असून इतर दोन खाजगी शाळा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्था आहेत. नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश, शिष्यवृत्ती अर्ज, परीक्षा फॉर्म भरणे ठप्प झाले आहे.
  2. आर्थिक व्यवहार ठप्प : गावात दोन बँका, दोन सेतू सुविधा केंद्र, CSC सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राची मोठी इमारत आहे. मात्र नेटवर्क अभावी शेतकरी, व्यापारी, कर्मचारी-अधिकारी यांचे पगार, पैशांचे व्यवहार, पीक कर्ज वितरण पूर्णपणे बंद पडले आहे.
  3. गरीब-वंचितांना फटका : वयोवृद्ध, अपंग, विधवा महिलांना संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग योजनेचा शासनाकडून मिळणारा पगार खात्यात येऊनही नेटवर्क नसल्याने पैसे काढता येत नाहीत. आधार लिंक, e-KYC ची कामे खोळंबली आहेत.
  4. २८ दिवसांची लूट : जिओ कंपनी ‘एक महिना’ रिचार्जच्या नावाखाली फक्त २८ दिवसांची वैधता देते. त्यातही १० ते १५ दिवस नेटवर्क गायबच असते. म्हणजेच ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेऊन अर्धीच सेवा दिली जात आहे. ही उघड फसवणूक व पैशांची लूट आहे.

कंपनीचा बेजबाबदारपणा

ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही जिओ कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांचा बेजबाबदारपणा व दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. इकडे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना तिकडे कंपनीचे अधिकारी मात्र घरात बसून कूलर-AC मध्ये निवांत झोपा घेत आहेत, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “नेटवर्क नसल्याने शाळेचे प्रवेश भरता येत नाहीत. बँकेतून पेन्शनचे पैसे काढता येत नाहीत. तक्रार करूनही कंपनीवाले ढुंकून पाहत नाहीत. रिचार्जचे पैसे घेतात पण नेटवर्क देत नाहीत. ही सरळ दरोडेखोरी आहे.”

– *संतप्त जिओ < ग्राहक, सावळदबारा ] #ग्रामस्थांची मागणी तात्काळ टॉवर दुरुस्ती : सावळदबारा येथील जिओ टॉवर तातडीने दुरुस्त करून २४ तास अखंडित नेटवर्क सेवा सुरू करावी.

  1. नुकसान भरपाई : नेटवर्क नसलेल्या कालावधीचे रिचार्जचे पैसे ग्राहकांना परत करावेत किंवा वैधता वाढवून द्यावी.
  2. कठोर कारवाई : कामचुकार कर्मचारी, अधिकारी व जिओ कंपनीवर शासनाने कठोर नियम लागू करून दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी.
  3. पर्यायी व्यवस्था : BSNL सारख्या सरकारी कंपनीचे नेटवर्क या आदिवासी भागात सक्षम करावे.
    डिजिटल इंडिया की डिजिटल फसवणूक? सावळदबारात जिओचे पैसे घेऊन नेटवर्क गायब, शेतकरी-विद्यार्थी रडवले

रिचार्ज २८ दिवसांचा, नेटवर्क १० दिवसांचं! सावळदबारात जिओ कंपनीचा ग्राहकांना उघड चुना
टॉवर आहे पण ‘रेंज’ नाही! सावळदबारात जिओचा कारभार म्हणजे निव्वळ थट्टा!
आदिवासी बहुल डोंगराळ भागातील जनता डिजिटल इंडियापासून वंचित राहत आहे. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास जिओ कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिओ ग्राहक, विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.

एन. टीव्ही न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *