उमरखेड़ ता प्रतिनिधि
मा. मा. पोलीस अधिक्षक सा. याच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि.30/05/2026 रोजी डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पोउपनि सागर इंगळे यांना माहीती मिळाली की, नांदेड कडुन उमरखेड कडे येणाऱ्या मालेगाव फाटा जवळ एक इसम नामे शेख इब्राहिम उर्फ इरफान शेख पाशु, वय-25 वर्ष, रा. जामा मस्जिद वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ ज्याने अंगात ग्रे रंगाचे हाफ टि-शर्ट व काळ्या भुरकट रंगाची जिन्स पॅन्ट परीधान केलेला असुन गांजाची विक्री करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ घेवुन बाळगुन आहे. अशा गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पो स्टे उमरखेड, पोउपनि सागर इंगळे, पोहेका/2020, पोशि/1652 टेंभरे, पोशि/2673 गिते, पोशि/1191 महाळनर, पोशि/137 दरबस्तेवार, पोशि/1275 किरण राठोड चालक पोकॉ/2734 मेटकर तसेच वजनकाटेवाले, फोटोग्राफर, दोन सरकारी पंच असे रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे शेख इब्राहिम उर्फ इरफान शेख पाशु, वय-25 वर्ष, रा.जामा मस्जिद वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे ताब्यातील एक लालसर रंगाची पोतडी ज्यावर इंग्रजी मध्ये HIMAT लिहलेली पोतडी मध्ये हिरवट काळपट गांजा अंमली पदार्थ त्यामध्ये काही गांजा हा प्लॅस्टिक च्या पुड्या मध्ये पॅक केलेला ज्याचे पोतडी सह वजन 1285 ग्रॅम कि अं 20,000/-रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकुण कि अं 23000/- रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पो स्टे उमरखेड येथे अप क्र 458/2026 कलम 8 (क), 20 (ब), (ii) (ब) एन.डी.पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहका/2020 ठाकुर, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/ 2673 दिगांबर गिते, पोशि/1275 किरण राठोड, पोशि/137 अकुश दरबस्तेवार, पोशि/1191 निवृत्ती यांनी यशस्वीरित्या पार पाडली असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा हे करीत आहेत.
