♦️बाल लैंगिक अत्याचारासह गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पसार असलेला आरोपी एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. करण काळे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.


♦️एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार सहा महिन्यापासून गंभीर गुन्ह्यात पसार असलेला आरोपी काळे हा दुचाकीवरून त्याच्या राहत्या घरी जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सह्याद्री चौकात नाकाबंदी सुरु असताना तेथील पथकास आरोपी ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896