♦️बंद घराच्या पाठीमागील रूमची खिडकी कशाने तरी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सामनाची उचकापाचक करून बेडरूम मधील कपाटातील तीस हजार रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना बालिकाश्रम रस्त्यावरील गायकवाड मळा येथे घडली.
♦️याबाबत श्रीरंग हेमंत पाष्टेकर (वय २५) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाष्टेकर यांनी घराला कुलूप लावून त्यांच्या आईला सांगळे गल्ली येथे सोडले व ते ऑफिसला गेले. त्यानंतर ते सायंकाळी सात वाजता घरी गेले असता बंद घराच्या दरवाजाच्या पाठीमागील रूमची खिडकी चोरट्याने कशाने तरी उचकाटून तोडलेली दिसली. घरातील सामनाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले 30 हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेले.